तपशील

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरात विविध जनहिताचे उपक्रम आयोजित करण्यात आले.

या निमित्ताने शिरूर नगरपरिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपर्क कार्यालय आणि शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच जनसेवा सप्ताह अंतर्गत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मोफत आरोग्य शिबिरातील सेवा

रक्तगट तपासणी.

रक्तशर्करा तपासणी.

हिमोग्लोबिन तपासणी.

माता व बाल आरोग्य सेवा.

एनसीडी तपासणी.

मोफत औषध वितरण.

आरोग्य समुपदेशन.

गरजेनुसार रेफरल सेवा.

शिबिराचे वेळापत्रक

२३ जुलै - शिरूर ग्रामीण रुग्णालय

२४ जुलै - शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय

२६ जुलै - न्हावरे ग्रामीण रुग्णालय

विशेष स्वच्छता मोहीम

जयंतीनिमित्त शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, रस्ते व नाल्यांची साफसफाई, कचरा संकलन, स्वच्छतेबाबत जनजागृती आणि नागरिकांचा सहभाग या बाबींवर विशेष भर देण्यात आला.